पालघर : केंद्रीय जलशक्ती आणि आदिवासी व्यवहार राज्यमंत्री बिश्वेश्वर टूडू हे पालघर जिल्ह्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले असून आज त्यांनी दिवसभरात मनोर, डहाणू, विक्रमगड आणि जव्हार भागाचा दौरा केला. दरम्यान यावेळी मनोर इथं आदिवासी बांधवांनी त्यांचं सुप्रसिद्ध तारपा नृत्यानं स्वागत केलं. आणि त्यांनी देखील आदिवासी बांधवांसोबत ताल धरून तारपा नृत्य केलं.
आज सकाळी त्यांनी पालघर जिल्ह्यातल्या मनोर इथं २५,०३९ स्कवेअर मीटर क्षेत्रात पालघर जिल्ह्यासाठी तयार होत असलेल्या 6 मजली आणि २०० बेडची प्रशस्त सुविधा असलेल्या ट्रामा सेंटरला भेट देवून ट्रामा सेंटरच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी ट्रामा सेंटरच्या उभारणीच्या कामात होत असलेल्या दिरंगाई बाबत आणि अर्धवट माहिती घेवुन उपस्थित असलेल्या संबंधित अधिका-यांना खडे बोल सुनावले. आणि आता यापुढे कामात दिरंगाई न करता प्रोपरली प्लानिंग करून या ट्रामा सेंटरचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सुचना यावेळी केंद्रीय राज्यमंत्री बिश्वेश्वर टूडू यांनी सबंधित अधिका-यांना दिल्या.
तसचं त्यांनी आज सकाळी मनोर मध्ये वारली कलेचा वारसा जपण्यासाठी आणि वारली कलेला चालना देण्यासाठी जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या भव्य वारली हाटला देखील भेट देवून तिथल्या कामाचा आढावा घेतला. कोणताही एक प्रोजेक्ट हाती घेतल्यानंतर त्याची एक प्रोपर प्लानिंग असते, आपण कशासाठी हा प्रोजेक्ट तयार करत आहोत हे देखील तितकचं महत्वाचं असतं, नाकी ते बनल्यानंतर त्याचा विचार करायचा असतो, त्याची अगोदरचं प्लानिंग करायची असते, मात्र असं तुमचं कोणतही नियोजन दिसून आलेलं नाहीये अशा शब्दांत त्यांनी संबंधित अधिका-यांना सुनावले. ज्यावेळी तुम्ही अशा प्रोजेक्टसाठी शासनाचा निधी वापरता त्यावेळी त्यांचं आउटपुट काय, याचं देखील प्लानिंग तुम्ही करायला हवं असं ही यावेळी केंद्रीय राज्यमंत्री बिश्वेश्वर टूडू म्हणाले.