पालघर : पालघर जिल्ह्यातल्या बोईसर मध्ये एका तरुणाने तरुणीवर भरदिवसा गोळीबार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा सर्व प्रकार तिथे असलेल्या सीसीटीवी कॅमे-यामध्ये कैद झाला असून ते सीसीटीवी फुटेज आता समोर आलं आहे.बुधवारी दुपारी 3.30 वाजताच्या दरम्यान बोईसर मधल्या टिमा हॉस्पिटल समोर हा गोळीबार झाला. या गोळीबारात स्नेहा दिनेश महतो या तरुणीला डोक्यात गोळी लागल्यानं तिचा जागीच गोळी लागुन मृत्यू झाला. तरुणीला गोळी मारून आरोपी कृष्णा सत्यदेव यादव याने घटनास्थळापासून सुमारे 500 मीटर अंतरावर डी डेकॅार कंपनी समोर सीआयएसएफच्या वाहनाखाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता आरोपीचा देखील मृत झाला आहे.
या घटनेत पिस्टल हस्तगत करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून बोईसर पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत. प्रेम प्रकरणातून हा गोळीबार केला गेला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान आरोपी आणि मयत मुलगी यांचा प्रेम प्रकरण असून मयत मुलीच्या कुटुंबियांकडून लग्न करण्याच्या आग्रहानंतरही हा आरोपी तरुण लग्न करण्यास टाळाटाळ करत असल्याची माहिती मयत मुलीच्या आईकडून देण्यात आली आहे.