पालघर : पालघर जिल्ह्यात २,३८,४०४ गोवंशीय वर्गीय पशूधन असून त्यापैकी १७ पशूंना लम्पी आजाराची लागण झाली आहे. त्यातील १२ पशू उपचार घेऊन बरे झाले असून २ पशूंचा मृत्यू झाला आहे. उर्वरित पशूंवर उपचार सुरू आहेत. पालघर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी लम्पी आजाराने बाधित असलेल्या वसई, तलासरी आणि डहाणू तालुक्यांत भेट देऊन पाहणी केली.
जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.प्रशांत कांबळे यांनी लम्पी स्किन रोग नियंत्रणात आणण्यासाठी गोशाळा, पशुपालक आणि खाजगी पशुवैद्यक यांची सभा घेऊन त्यांना मार्गदर्शन केलं.
आजारी जनावराला उपचार करणे नियमित सुरू असून डहाणू तालुक्यात ७१ हजार गोवंशिय जनावरांना लस देण्यात येणार आहे. हा रोग म्हशींमध्ये आढळून आलेला नाही, हा रोग माणसाला होत नाही, तसचं दूध पिल्याने सुद्धा हा आजार होणार नाही त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये असं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पंजाब चव्हाण यांनी केलं आहे.