पालघर : महावितरणच्या बोईसर ग्रामीण उपविभागात सेवा पंधरवाड्यानिमित्त ग्राहकांच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात नावात बदल करण्यासंदर्भातल्या १७ अर्जांवर कार्यवाही करण्यात आली. तसचं सेवा पंधरवाड्याच्या कालावधीत आतापर्यंत सिंगल फेजच्या २९९ आणि थ्री फेजच्या १४ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.
पालघर विभागाचे कार्यकारी अभियंता प्रताप मचिये यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर घेण्यात आलं. या सेवा पंधरवाड्यानिमित्त महावितरणच्या विविध कार्यालयांकडून ग्राहकांच्या प्रलंबित अर्जांवर कार्यवाही पूर्ण करण्यात येत आहेत.