पालघर : पालघर जिल्ह्यातल्या जव्हार मधल्या जुना राजवाडा इथं कुस्तीचे जंगी सामने पार पडले. या स्पर्धेत महाराष्ट्रातल्या 200 पेक्षा जास्त कुस्तीपट्टूनी सहभाग घेतला होता. जव्हार मधल्या जुना राजवाडा इथं संस्थान काळापासून मातीतील कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं. मात्र मागील दोन वर्ष कोरोनाचं सावट असल्यानं या स्पर्धा पार पडल्या नव्हत्या.
यंदा मोठ्या थाटात या कुस्ती स्पर्धा पार पडल्या. परिसरातल्या नागरिकांनी ही या स्पर्धा बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या स्पर्धेत शत्रूघ्न भोईर आणि नारायण कारभारी हे अंतिम विजेते ठरले. त्यांना बक्षीस म्हणून प्रत्येकी आठ – आठ हजार रुपयांची रोख रक्कम, श्रीफळ आणि शाल देण्यात आली.