पालघर : पालघर जिल्ह्यातील बोईसर मध्ये आशीर्वाद फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेकडून रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ही संस्था विविध क्षेत्रातली कार्य करण्याबरोबरच आरोग्यसवेत देखील कार्यरत आहे. आशीर्वाद फाउंडेशनचे संस्थापक विक्रम सैनी यांच्या नेतृत्वाखाली बोईसर रेल्वे स्थानकावर या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या रक्तदान शिबिरात दिवसभरात जवळपास 120 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला. यावेळी डहाणूच्या छेडा ब्लड बँकेच्या संपूर्ण टीमने विशेष सहकार्य केले.
या शिबिरात आशीर्वाद फाउंडेशनचे उपाध्यक्ष रवी सिंह, संस्थेचे वरिष्ठ पदाधिकारी विनोद पोद्दार, शिवशंकर तिवारी यांनी विशेष योगदान दिले. तसेच या स्वयंसेवी संस्थेचे सदस्य पंकज गुप्ता, राजेश सिंह ,कौशल बलसारा, अमित गुजर, उमेश सिंह ,तुषार सरोडे, प्रवीण पाटील, मनोहर वाणी, निलेश सरोदे, पराग देव, सूरज सैनी, उत्कर्ष सिंह, रोहित सिंह, मनीष श्रीवास्तव, राष्ट्रीय हिंदू सेवा संघाचे पालघर जिल्हा अध्यक्ष ललित माली, समाज सेविका प्रियंका सिंह, टीना गुप्ता, चारू गुजर, निशा सिंह यांनी हे रक्तदान शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विशेष सहकार्य केले.