पालघर : पालघर मधल्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात आता रशियन, फ्रेंच आणि जर्मन या तीन परदेशी भाषांमधले सर्टिफिकेट कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. रशियन आणि फ्रेंच या सर्टिफिकेट कोर्सेसचे यंदा हे सलग दुसरे वर्ष आहे. या दोन्ही कोर्सेसना मिळालेला भरघोस प्रतिसाद लक्षात घेता यंदा जर्मन कोर्सही नव्यानं सुरू करण्यात आला आहे.
जागतिकीकरणामुळे वाढलेल्या रोजगाराच्या संधी आणि नोकऱ्यांंचे बदललेले स्वरूप यांमुळे परदेशी भाषांना आलेले महत्त्व लक्षात घेत दांडेकर महाविद्यालयानं विद्यार्थी आणि भाषाप्रेमींसाठी या तीन सर्टिफिकेट कोर्सेसच्या माध्यमातून एक महत्त्वाची संधी उपलब्ध करून दिली आहे.
या कोर्समध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांनी किमान १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या कोर्सेसचं प्रशिक्षण ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीनं दिलं जाणार आहे. त्यामुळे इच्छुक व्यक्तींनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे, प्रा. डॉ. तानाजी पोळ, समन्वयक प्रा. ऋतुजा राऊत- ९३५९५९७५९२, प्रा. मधुरा राऊत- ८८३०७३२०८१ यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी केलं आहे.