पालघर : विद्यार्थ्यांनी प्रथम आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करावे म्हणजे ध्येय गाठणे सहज शक्य होते. याचे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम होय असे प्रतिपादन सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे सचिव प्रा. अशोक ठाकूर यांनी केले. डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. महाविद्यालयाच्या रा.हि.सावे ग्रंथालयाच्या वतीने डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून चित्रीकरणाच्या माध्यमातून ग्रंथ परिक्षण स्पर्धा आयोजित केली होती. तसेच, प्रोत्साहनपर ग्रंथाचे प्रदर्शनही आयोजित केली होते.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांची प्रमुख उपस्थिती होती. वाचन चळवळीला आणखी गती देण्यासाठी चित्रीकरण ग्रंथ परिक्षण स्पर्धा अधिक उपयुक्त ठरू शकतात यासाठी समाजमाध्यमाचा प्रभावीपणे वापर करता येर्इल असे विचार डॉ. सावे यांनी आपल्या भाषणातून मांडले.
या कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथपाल प्रा.डॉ. शिला गोडबोले पार्इकराव यांनी केले. या कार्यक्रमाला प्रा. प्रकाश घरत, प्रा. यादव मोरे, ग्रंथालयीन कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.