पालघर : कातकरी समाजाची मुलं जर शिकली तर राज्यपाल काय ती द्रौपदी मुर्मु यांच्या सारखी देशाचे राष्ट्रपती सुद्धा बनू शकतात असं मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केलं. पालघर जिल्ह्यातल्या वाडा इथं स्वीमी विवेकानंद विद्यामंदिर शाळेत आयोजित कातकरी समाजाचा भव्य सांस्कृतिक मेळाव्यात ते बोलत होते. कोरोनाचा काळ असून सुद्धा कोरोनाच्या काळात 23 हजार कातकरी समाजाच्या बांधवांच्या समस्यांचं समाधान आम्ही केलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. 80 करोड घरांना प्रधानमंत्री मोफत अन्न पुरवत असल्याचं सांगत त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुती सुमन उधळली.
दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी वाड्यात आयोजित कातकरी समाजाच्या भव्य सांस्कृतिक मेळाव्याचं उदघाटन केलं. त्याचबरोबर जव्हार मधल्या प्रगती प्रतिष्ठानच्या पन्नासाव्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाला उपस्थित राहून विविध वास्तूंचं उद्घाटन त्यांनी यावेळी केलं.
सिद्धिविनायकला जाऊन दर्शन घेण्यापेक्षा गरिबांची आणि मूकबधिरांची सेवा करा त्यातून जास्त पुण्य मिळेल असं वक्तव्य भगतसिंग कोश्यारी यांनी जव्हार मधल्या प्रगती प्रतिष्ठानच्या पन्नासाव्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना केलं. यावेळी राज्यपालांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक स्वर्गीय वसंतराव पटवर्धन यांच्या अर्ध पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. तसचं कर्णबधिर मुलांसाठी निवासी शाळा, दिव्यांग विद्यार्थी वस्तीगृह अशा विविध इमारतींचं उद्घाटन देखील यावेळी राज्यपालांच्या हस्ते पार पडलं. आदिवासी अतिदुर्गम भागात 50 वर्षांपासून काम करणाऱ्या प्रगती प्रतिष्ठानचं यावेळी राज्यपालांनी कौतुक केलं . दरम्यान या कार्यक्रमात राज्यपालांनी देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुती सुमन उधळली.