पालघर : आदिवासी विकास विभागाच्यामार्फत आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिका-यांची दोन दिवसीय सहावी वार्षिक प्रकल्प अधिकारी परिषद आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्या मधल्या गालतरे या गावातल्या इको गोवर्धन व्हिलेज मध्ये संपन्न झाली.
आदिवासी विकास प्रकल्पाच्या शाळामध्ये, वसतीगृहांमध्ये कशाप्रकारे शिक्षण सुरु आहे, त्यामध्ये नवीन काय का्य करता येवू शकते यावर विचार मंथन करण्यासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी वेगवेगळया प्रकल्प अधिकार्यानी त्यांच्या प्रकल्पात राबवलेले शिक्षणाच्या बाबतीतले नवीन आणि यशस्वी उपक्रम, यशोगाथा आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत सादर केल्या. त्यातून वेगवेगळया प्रकल्पातले यशस्वी उपक्रम इतर प्रकल्पांमध्ये सुद्धाराबवता येतील का यावर देखील इथं विचार मंथन झालं. शिक्षणा बरोबरचं या भागातल्या काही अडचणी आहेत, प्रामुख्यानं फारेस्ट राइट, कम्युनिटी फारेस्ट राइट्स आहेत त्या मध्ये काय अडचणी आहेत, त्यात काय विकास करता येवू शकतो, त्यातून तिथे तलाव बांधता येवू शकतो का जेणेकरून त्यांचा विकास होवू शकेल या सारख्या विषयांवर या परिषदेत चर्चा करण्यात आली असल्याची माहिती यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली. तसचं पेसा कायद्याची अंमलबजाणी योग्य प्रकारे व्हावी, पेसाची निर्मिती ज्या उद्देशाने झाली त्याचा फायदा त्या गरजू माणसाला झाला पाहिजे यावर सुद्धा इथे विचारविनिमय करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं.
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून संसदीय संकुल विकास परियोजनेतील गावं पुढील सहा महिन्यात पूर्ण इनस्फ्रास्ट्रचर तयार करून त्याठिकाणी लोकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचं प्लान याठिकाणी तयार करण्यात आला. त्यांची अंमलबजावणी पुढील महीनाभरात सुरु होईल आणि मार्चच्या अगोदर संपेल अशी माहिती यावेळी आदिवासी विकास मंत्र्यांनी दिली.
या साहव्या दोन दिवसीय वार्षिक प्रकल्प अधिकारी परिषदेला पुणे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे चे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, नाशिक आदिवासी विकास आयुकतालयाचे आयुक्त हीरालाल सोनावणे, मुंबई आदिवासी विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी आदी उपस्थित होते.