पालघर : पालघर जिल्हा परिषदेत अडीच वर्षासाठी झालेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावर भाजप आणि एकनाथ शिंदे गटानं आपली बाजी मारली आहे. बुधवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाचे प्रकाश निकम हे अध्यक्ष पदी आणि भाजप चे पंकज कोरे हे उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवडून आले आहेत. यापूर्वी हे अध्यक्ष पद शिवसेनेकड़े तर उपाध्यक्ष पद हे एनसीपी पक्षाकड़े होते.
57 सीट असलेल्या पालघर जिल्हा परिषदेत अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे 20 सदस्य, एनसीपी चे 13 सदस्य, भाजप चे 13 सदस्य, सीपीएम चे 6 सदस्य आणि बविआ चे 5 सदस्य निवडून आले होते.