पालघर : पालघर जिल्ह्यातल्या डहाणू आणि तलासरी तालुक्यात आज सकाळी चार वाजून चार मिनिटांनी ३.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. या मध्यम स्वरूपाचा भूकंपाचा धक्का होता. सकाळी बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमध्ये अद्याप कोणतीही हानी झाल्याचं वृत्त नाही.
पालघर जिल्ह्यात 2018 पासून म्हणजे जवळपास चार वर्षांपूर्वी पासून हिवाळ्याच्या दिवसांत भूकंपाचे धक्के बसण्यास सुरवात झाली होती. या भूकंप बसण्याच्या चक्राला आता पाच होत आली आहेत. आणि अजून या भागांत भूकंपाचे धक्के बसण्याचं सत्र सुरूच आहे. मात्र हे भूकंपाचे धक्के या भागांत नक्की का बसत आहेत याचं कारण अजूनही प्रशासनाला कळू शकलेलं नाही.