पालघर : एकात्मिक आदिवासी प्रकल्प जव्हार आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय मोखाडा यांच्या संयुक्त विद्यामानं कातकरी समाजाच्या शेतकरी बांधवांसाठी मोखाडा तालुक्यातल्या लोहारपाडा मधल्या शिक्षक पतपेढीत दोन दिवसीय शेतीविषयक प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं.
या दोन दिवसीय शेतीविषयक प्रशिक्षण शिबिरात कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे प्रा.भरत कुशारे यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना कश्या प्रकारे शेती करावी याबबत मार्गदर्शन केलं. तसचं पशुवैद्यकीय अधिकारी परमेश्वर पोटे यांनी डेरी आणि कुक्कुटपालन, प्रा.स्वाती देशमुख – मोखाडा तालुका कृषी अधिकारी सुनिल पारधी यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी, डॉ. लंबाडे यांनी आंबा आणि काजू या फळपिकावर येणारी किड आणि रोग याविषयी, मंडळ कृषी अधिकारी प्रेमदास राठोड यांनी आंबा आणि काजू फळपिकांची लागवड या विषयी, सुंर्यकांत गवळे यांनी आदिवासी प्रकल्पाच्या योजने बाबत उपस्थित शेतकरी बांधवांना सविस्तर मार्गदर्शन केलं.
लाच घेताना महावितरणच्या दोन अधिका-यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केली अटक
यावेळी जव्हार एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी आयुषी सिंह, मोखाडा तालुका कृषी अधिकारी सुनिल पारधी, सभापती भास्कर थेतले, उपसभापती प्रदीप वाघ, उपविभागीय कृषी अधिकारी नरेंद्र आघाव, पंचायत समिती सदस्या लक्ष्मी भुसारा, अनिता पाटील, खोडाळा मंडळ कृषी अधिकारी साळुंखे, सर्व कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक बी.टी.एम, राहुल झोपळे, सेवा नडगे, शेतकरी बंधू आणि भगिनी आदी उपस्थित होते.