पालघर : पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्या मधील माण च्या अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील माध्यमिक शिक्षक चेतन ठाकरे यांना महाराष्ट्र आदर्श शिक्षण रत्न या राज्यस्तरीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे ब्लु स्टार सामाजिक व बहुउद्देशिय संस्थेमार्फत या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
शिक्षक चेतन ठाकरे यांच्या शैक्षणिक, सामाजिक, कृषी, क्रीडा, सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यार्थीभिमुक, विद्यार्थीप्रिय, समाजप्रिय असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. आतापर्यंत सर्वात कमी वयामध्ये हा पुरस्कार मिळविण्याचा मान त्यांना प्राप्त झाला आहे. त्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
यावेळी पंढरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष महादेव भालेराव, संस्थेचे अध्यक्ष चंदन बनसोडे, निलेश हांडे , दीप्ती हांडे आदी मान्यवर उपस्थित होते.