पालघर : आयुष्यात माणसं जोडणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणून आयुष्यात माणसं जोडण्याला प्रथम द्या असं मत संविधान व्याख्याते दिपेश पष्टे यांनी व्यक्त केलं. आपले मानवाधिकार फाउंडेशनचे पालघर तालुका प्रचारक विद्या निकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे जिल्हा अध्यक्ष देवेंद्र शिवचरण मेश्राम यांच्याकडून पालघर जिल्ह्यातल्या बोईसर मधल्या सालगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित करण्यात आलेल्या समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुणवंत व्यक्तींच्या सत्कार सोहळ्यात आणि गरजू मुलांना शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
माणसांसाठी माणूस म्हणून काम करणारी आमची ही मानवाधिकार ही संघटना आहे, प्रत्येक व्यक्तींने आपल्या आयुष्यात प्रथम स्थान हे माणसं जोडण्याला आणि मग त्यानंतर दुसरं स्थान हे पैश्याला द्यायला हवं असं मत मानवाधिकार फाऊंडेशन चे संचालक आणि संविधान व्याख्याते दिपेश पष्टे यांनी विद्यार्थ्याना आणि उपस्थितांना मार्गदर्शन करताना व्यक्त केलं.
आपले मानवाधिकार फाउंडेशनचे पालघर तालुका प्रचारक Vidya Niketan Social and Educational Institutionजिल्हा अध्यक्ष देवेंद्र शिवचरण मेश्राम यांच्याकडून सालगाव जिल्हा परिषद शाळेत शुक्रवारी गरजू विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संस्थेच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या पत्रकारांना दर्पण पुरस्कार देवून गौरविण्यात आलं. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्यांना सेवा रत्न पुरस्कार देवून, गौ रक्षकांना गौ सेवा, निसर्ग प्रेमीना निसर्गरत्न, शिक्षकांना ज्ञानदुत, समाजात दान करणाऱ्यांना दानविर यासारखे पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचं आणि खाऊचं वाटप करण्यात आलं.
या कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून तसचं सरस्वती देवीच्या आणि डॉ.बाबसाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमात मानवाधिकार फाऊंडेशन चे संचालक आणि संविधान व्याख्याते दिपेश पष्टे हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हे सपना प्रभू यांनी केलं तर कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांचे, विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक निलेश सावे आणि देवेंद्र मेश्राम यांनी दोन्ही संस्थेच्या वतीने सर्वांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला पत्रकार जगदीश करोतीया, ओमप्रकाश द्विवेदी, अजित सिंह, दिपक निराला, निता चौरे तसेच राष्ट्रीय सेवाभावी संस्था के.सी.एन. क्लब चे राष्ट्रीय अध्यक्ष नंदन मिश्रा, राष्ट्रीय हिंदू सेवा संघचे पालघर जिल्हा अध्यक्ष ललित माली, उपाध्यक्ष येजुवेंद्र सावे, कोषाध्यक्ष हिम्मत जैन, निता राऊत, गौ रक्षक सुर्जेश जोशी, पिंटू मिश्रा, लक्ष्मण वेदाडे, रोहित सिंह, निसर्ग प्रेमी उमेश सोनार आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी देवेंद्र मेश्राम, सपना प्रभु, शिक्षक निलेश सावे, शिक्षका रूपा सावे, जयवंत मेस्त्री, शुभम चौबे यांनी विशेष मेहनत घेतली.