पालघर : पालघर मधल्या गोल्ड टॉकीज आणि बोईसर मधल्या केटी टॉकीज मध्ये आज अभिनेता शाहरुख खानच्या पठान या चित्रपटाच्या शो ला विरोध करण्यासाठी टॉकीजच्या बाहेर जमलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना बोईसर आणि पालघर पोलिसांनी काही काळ ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेतलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून सोडण्यात आलं.
पोलिसांच्या बंदोबस्तात पालघरच्या गोल्ड टॉकीज मध्ये आणि बोईसरच्या केटी टॉकीज मध्ये पठान चित्रपटाचे सर्व शो सुरळीत सुरु आहेत.