पालघर : आंतरिक विकास साधण्यासाठी धर्माची गरज असते, धर्माचे मूल्य, संस्कार हे जर आपण आपल्यात बिंबवले तर त्या बाह्य विकासाबरोबरच आंतरिक विकास ही तेवढाच महत्वाचा आहे, आणि तो विकास धर्म करू शकतो आणि संप्रदाय करू शकतो असं गोव्याचे केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपादजी नाईक म्हणाले. पद्यनाभाच्यार्य स्वामी महाराज यांचा 111 व्या संजीवन समाधी महोत्सवानिमित्त पालघर जिल्ह्यातल्या टेंम्भोडे इथं भक्तनिवास उर्फ मोरेश्वर हालोजी पाटील सभागृह उद्घाटन आणि प्रसादालय, भारतीनिवास आणि श्री देव मामलेदार उद्यानाच्या वास्तूच्या भूमिपूजनाच्या आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. पर्यटन वाढलं पाहिजे, कारण त्यावर बऱ्याच कुटुंबांना रोजगाराचा आधार मिळतो असं मत ही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
यावेळी प्रसादालय, भारतीनिवास आणि श्री देव मामलेदार उद्यानाचं वास्तू भूमिपूजन आणि हे गोव्याचे केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपादजी नाईक यांच्या हस्ते पार पडलं. तसचं केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वडिलांच्या नावावर ठेवण्यात आलेल्या भक्तनिवास उर्फ मोरेश्वर हालोजी पाटील सभागृहाचं उदघाटन हे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं.
आताची तरुण पीढ़ी ही संप्रदायाकडे आकर्षित होत नाही, त्यामुळे त्यांना संप्रदायाकडे आकर्षित करण्यासाठी पद्यनाभाच्यार्य स्वामींचा विचार त्यांच्या मनामध्ये रुजवण्याची आवश्यकता आहे असं यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केलं.
पद्यनाभाच्यार्य स्वामी महाराज यांचा 111 व्या संजीवन समाधी महोत्सवानिमित्त पालघर मधल्या टेंम्भोडे गावात जिल्ह्यासह इतर अनेक ठिकाणांहुन भाविक मोठ्या संख्येनं इथं जमले होते.