पालघर : पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्या मधल्या चारोटीपासून पाच किलोमीटर अंतरावर असेलल्या महालक्ष्मी मंदिराजवळ मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी कार आणि लक्झरी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेसह चार जणांचा मृत्यु झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.
पहा व्हिडिओ …….
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 3 वाजताच्या दरम्यान GJ 5 CM 2222 स्कोडा ही कार गुजरातहुन मुंबईच्या दिशेनं येत असताना कार चालकाचं गाडी वरील नियंत्रण सुटल्यानं गुजरातच्या दिशेने जाणा-या वाहिनीवरील AR 01 P 6734 या लक्झरी बसला कारनं धडक दिली. दरम्यान कार आणि लक्झरी बस एकमेकांना समोरासमोर धडकून हा भीषण अपघात झाला. या अपघातात कार मधल्या मोहम्मद अब्दुल कलाम सलाम हाफिज (३६ वर्षे ), इब्राहिम दाऊद (६० वर्षे), आशियाबेन कलेक्टर (५७ वर्षे), इस्माईल मोहम्मद देसाय (४२) या चार जणांचा जागीच मृत्यु झाला. तर लक्झरी बस मधले तीन जण जखमी झाले आहेत.
सर्व मृत व्यक्ती हे गुजरात राज्यातल्या सुरत जिल्ह्या मधल्या बार्डोली गावचे रहिवासी होते.