पालघर : पालघर जिल्ह्यातल्या विरार जवळ मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खानिवडे टोलनाक्याजवळ स्कॉर्पिओ कार आणि ट्रक एकमेकांना समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यु झाला असून ट्रक चालक जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेनुऊ वाजताच्या दरम्यान मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खानिवडे टोलनाक्याजवळ स्कॉर्पिओ कार चालक मुंबईहुन गुजरातला जात असताना आणि खडीने भरलेला ट्रक हा मुंबईच्या दिशेने येत असताना स्कॉर्पिओ कार आणि ट्रक समोरासमोर धडकल्यानं हा भीषण अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये कार चालक अरुणकुमार पारीख याचा जागीच मृत्यु झाला. मृत कार चालक हा गुजरातमधली गांधीनगरचा राहणारा होता.
या अपघातानंतर मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतुककोंडीची समस्या निर्माण झाली होती.