पालघर : पालघर जिल्ह्यातल्या बोईसर मधल्या तारापूर औद्योगिक क्षेत्रात प्लॉट नंबर टी-१०८ आणि १०९ मध्ये असलेल्या जेपीएन फार्मा या केमिकल कंपनीत आज सकाळी जवळपास १० वाजताच्या दरम्यान बॉयलर मध्ये प्रक्रिया सुरू असताना कंडेन्सरची काच फुटून भीषण स्फोट झाला. स्फोटादरम्यान निघालेल्या एका वायुची बाधा होऊन एका कामगाराचा मृत्यू झाला आहे तर तीन कामगार हे जखमी झाले आहेत. प्रयाग घरत असं मृत कमगाराचं नावं आहे. दरम्यान सर्व जखमी कामगारांवर बोईसर मधल्या संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्यावेळी हा स्फोट झाला त्यावेळी कंपनीत जवळपास ४९ कामगार हे काम करत होते.