पालघर : पालघर जिल्ह्यातल्या बोईसर मधल्या टिमा हॉल मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य , रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अंतर्गत असलेल्या पालघर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. गुरुवारी आयोजित या महारोजगार मेळाव्याचं उद्घाटन कौशल्य, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते पार पडलं.
पालघर जिल्ह्यात एका महिन्या मध्ये आदिवासी बांधवांसाठी विशेष स्कील सेंटर सुरु करण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य,रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या महारोजगार मेळाव्यात दिली. या माध्यमातून लोकांना स्वयं रोजगारासाठी जे स्कील हवं आहे ते लोकांना प्रमाणिकपणे देण्याचा आम्ही प्रयत्न करू असं ही यावेळी लोढा म्हणाले. पूर्वी प्रत्येकी महारोजगार मेळाव्यासाठी ग्रामीण भागाला ४० आणि शहरी भागाला ७० हजारांचा निधी होता ,मात्र आता तो आम्ही वाढवून ५ लाखांचा केला असल्याची माहिती यावेळी लोढा यांनी दिली. आम्ही बैंकांना तुमच्या तुमच्या सोबत जोडून, बैंकेकडून तुम्हाला लोन कसं मिळू शकेल यासाठी प्रयत्न करू तसचं स्वयं रोजगारासाठी लोन देणार्या अण्णाभाऊ साठे सारख्या विविध सरकारी असोसिएशनला तुमच्याशी जोडू असं आश्वाशन यावेळी लोढा यांनी उपस्थित उमेदवारांना दिलं. दरम्यान या महारोजगार मेळाव्यातुन जवळपास ५०० उमेदवारांना रोजगार मिळू शकेल अशी आशा यावेळी मंत्री लोढा यांनी व्यक्त केली.
या महारोजगार मेळाव्यात मुंबई आणि पालघर जिल्ह्यातल्या विविध भागातल्या जवळपास ५२ नामांकित कंपन्या मुलाखत घेण्यासाठी उपस्थित होत्या. या महारोजगार मेळाव्यात ९ वी, १० वी, ग्रेज्युएट, पोस्ट ग्रेज्युएट, आयटीआय , इंजीनियरिंग आदी शैक्षणिक पात्रता असणार्या उमेदवारांसाठी बैंक ऑफिस जॉब, एचआर एडमिन, एज्युकेशन कौन्सेलर, हॉउसकेअर, आयटी जॉब्स, बैंक ऑफिसर, सेल्स ऑफिसर, टेली कॉलर, स्टोअर इंचार्ज, कस्टम सर्व्हिस, फोन बैंकिंग, ब्रांच बैंकिंग, फेसिलिटी अटेंडेंट हॉउसकीपिंग, वॉर्डबॉय, डाटा सायंटिस्ट,सॉफ्टवेयर डेव्हलपर, कारपेंटर, वेल्डर, सिक्यूरिटी गार्ड, ऑफिस बॉय, इलेक्ट्रीशियन, ड्रायव्हर, प्लंबर, ट्रेनर, ट्रेनी, डेप्युटी मॅनेजर, मैकेनिकल, आएसी, वेल्डर, टर्नर, टर्नर पॉलेटेक्नीक, फेक्ट्री मॅनेजर, प्रोड्क्शन पाईलट, डिलीवरी पर्सन, मशीन ओपरेटर, डेव्हलपमेंट मॅनेजर- ऑफिसर, केमिस्ट, प्लांट मेंटनन्स, परचेस मॅनेजर, अशा विविध प्रकारच्या एकुण ४ हजार १९८ रिक्त पदांसाठी जवळपास ३ हजार उमेदवार नोकरीसाठी उपस्थित होते. दरम्यान यावेळी ८०६ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली तसचं विविध कंपन्यांकडून ४०० उमेदवारांची अंतिम निवड केली गेली.
या महारोजगार मेळाव्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांविषयी माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले होते, आणि त्याद्वारे विविध योजनांची माहिती आणि मार्गदर्शन रोजगारासाठी उपस्थित असलेल्या उमेदवारांना देण्यात आलं.