पालघर : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित “करिअर कट्टा” या उपक्रमा अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महाविद्यालयांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाची Centre of Excellence साठी निवड करण्यात आली आहे.
सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा विभाग महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसचं व्यवसाय शिक्षणासंबंधी विविध प्रकारचे कार्यक्रम राबवित असतो, त्याची दखल घेऊनच या महाविद्यालयाची निवड करण्यात आली आहे.
हे उपक्रम राबविण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांचे सातत्याने प्रयत्न सुरु असतात. दरम्यान स्पर्धा परीक्षा विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. अरुंधती बर्डे, प्रा. डॉ. शीला पाईकराव, प्रा. प्रशांत कदम यांचे प्रयत्न आणि योगदान यासाठी उपयोगी ठरलं, अशी प्रतिक्रिया यावेळी प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी दिली.