पालघर : गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 89 इतक्या नव्या रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातली कोव्हिड-19 च्या रुग्णाची आतापर्यंतची एकुण संख्या ही 40 हजार 257 वर पोहचली आहे.
त्यात वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातल्या 26 हजार 143 इतक्या तर पालघर ग्रामीण भागातल्या 14 हजार 114 इतक्या रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 911 इतक्या रुग्नांचा मृत्यु झाला आहे.
तर 38 हजार 030 इतके रुग्ण आतापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत पालघर ग्रामीण भागात 611 इतकी प्रतिबंधित क्षेत्रे आहेत.