पालघर : पालघर जिल्ह्यातल्या डहाणू मध्ये डहाणूच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालया अंतर्गत एक दिवसीय आदिवासी कलाकार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. आदिवासी कलाकारांनी तयार केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशानं भारतीय जनजातीय सहकारी विपणन विकास संघ ( TRIFED ) यांच्या मार्फत येत्या 16 मे ला या आदिवासी कलाकार मेळाव्याचं आयोजन केलं जाणार आहे.
या मेळाव्यात खरेदी समितीकडून निवडण्यात आलेल्या आदिवासी कलेच्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंची TRIBES INDIA यांच्यामार्फत खरेदी करण्यात येणार आहे . या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी १४ मे पर्यंत डहाणूच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात नागरिकांना नाव नोंदणी करता येईल.
क्षमता बांधणीच्या उत्कृष्ट कामगिरीत पालघर जिल्हा राज्यात पाचवा….
नाव नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना :
कलाकार अनुसूचित जमातीचा असावा, कलाकार अनुसूचित जमातीचा असल्याचा जातीचा दाखला आणि बँक पासबुक झेरॉक्स सोबत असणे आवश्यक आहे, एका कुटुंबातील एकाच सदस्याला सहभागी होता येईल , तसेच एका बचत गटाचा एक प्रतिनिधी सहभाग घेऊ शकेल. एका बाजूचा प्रवास खर्च आणि जेवण संस्थेकडून पुरविण्यात येईल. कलाकारांनी मेळाव्यास येताना तयार केलेल्या आदिवासी कलेच्या वस्तू सोबत आणाव्यात.