वसई : पालघर जिल्ह्यातल्या वसई मधल्या उमेलमान इथं राहणाऱ्या ९ वर्षाच्या चिमुकली स्वरा पाटील हिने हिमालय गिर्यारोहण मोहिम सारपास (१३८५० फुट) यशस्वीरित्या पुर्ण केली आहे. स्वरा ही कार्मेलाईट कॅाम्वेन्ट हायस्कूल या शाळेत शिकणारी विदयार्थीनी असून तिनं नुकतीच कळसुबाई शिखरावर यशस्वी गिर्यारोहण मोहिम पुर्ण केली होती.
९ वर्षाच्या वयात सारपास हि हिमालयीन गिर्यारोहण मोहिम पुर्ण करणारी स्वरा पाटील ही महाराष्ट्रातली पहिलीच मुलगी ठरली आहे. पालघर जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे .
१२ मे पहिल्या दिवशी कसोल बेस कॅम्प ५३०० फुट, १३ मे कसोल बेस कॅम्प ते ग्रहान ७८०० फुट, ग्रहन ते मीनताच १११००फुट, मीनताच ते नगारु १२४५०, नगारु ते बिसकरी वाया सारपास १३८५०फुट, बिसकरी ते बारशायनी ७२०० फुट अशा जवळपास ५ हिमालयीन गिर्यारोहण मेहिम तीने १२ ते १७ मे कालावधीत पुर्ण केल्या. कैलासरथ या गिर्योरोहण संस्थेमार्फत या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होत.