पालघर : पेट्रोलपंप, आणि रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांवर दरोडा टाकण्याच्या शितफित असलेल्या दरोडाखोरांचा डाव हाणून पाडत दरोडा टाकण्याच्या अगोदरच पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. दरोडेखोरांच्या या टोळी मधल्या चार आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं असून दोन आरोपी फरार झाले आहेत. त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी याविषयी माहिती देताना सांगितलं की, एका सतर्क ग्रामस्थानं पोलिसांना फोन करून कळवल की, गोवाडे जवळच्या पेट्रोलपंपावर काही संशयित लोक दबा धरून बसले आहेत. ही माहिती मिळताच मनोर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उमेश पाटील आपल्या टीम सह त्याठिकाणी पोहचले असता हे ६ दरोडखोर पोलिसांना पाहून पळून जात असताना पोलिसांना ४ दरोडेखोरांना पकडण्यात यश आलं असून २ आरोपी फरार झाले आहेत.
या आरोपींकडून पोलिसांनी ५३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यांच्या विरुद्ध मनोर पोलीस ठाण्यात कलम ३९९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार ही आरोपींना पालघर न्यायाल्याने १९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सर्व आरोपी हे मुळचे राजस्थान इथले रहिवासी आहेत. आणि हे सर्व जण बऱ्याच दिवसांपासून या पेट्रोलपंपवर दरोडा टाकण्यासाठी नजर ठेवून होते. मात्र ते दरोडा टाकतील त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक केली.