पालघर : पालघर पोलीस दलाकडून राबवण्यात येत असलेल्या जनसंवाद अभियाना अंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या पोलीस पाल्यांसाठी तसचं सुशिक्षीत बेरोजगार तरुण- तरूणसाठी भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. बुधवारी या रोजगार मेळाव्याचं उद्घाटन पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आलं.
या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी पालघर चे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील म्हणाले की, बेरोजगार तरणांना जर रोजगार मिळाला तर गुन्हेगारी कमी होऊ शकेल, त्यामुळे या मेळाव्याच्या माध्यमातून ३ हजार युवकांना आम्ही रोजगार दिल्यास या ३ हजार घरां मध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होईल. पुढे ते म्हणाले की, या माध्यमातून आम्ही पोलीस पाल्यांना ही रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे, या पूर्वी जिल्ह्यातल्या ७ उमेदवारांना जिल्हा पोलीस दलात भरतीच्या माध्यमातून सहभागी करून घेता आलं होत मात्र यंदा जिल्ह्यातल्या ४९ उमेदवारांना पोलीस विभागात भरतीच्या माध्यमातून सहभागी करून घेण्यात आलं आहे. हे आमचं यश आहे. या जनसंवाद अभियानामुळे गेल्या आठ महिन्यांत अनेक गुन्हे टळू शकले असल्याचं ही त्यांनी यावेळी सांगितलं.
या मेळाव्यासाठी ईच्छुक उमेदवरांनी २ ते १५ मे पर्यंत नाव नोंदणीसाठी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला असून या कालावधीत पालघर जिल्हयातल्या आणि जिल्ह्याबाहेरील जवळपास १०,००० उमेदवारांनी नाव नोंदणी केली आहे. तसचं पालघर जिल्ह्यातल्या बोईसर-तारापुर एमआयडीसी, पालघर, वाडा आणि तलासरी भागां मधल्या तसचं जिल्ह्या बाहेरील लहानमोठ्या अशा विविध जवळपास २१२ कंपन्यांनी या रोजगार मेळाव्यात सहभाग घेत बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून जवळपास ३००० उमेदवरांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती यावेळी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली.
९ वर्षाच्या चिमुकली स्वरानं केलं“सारपास”गिर्यारोहण यशस्वी……
नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती या आजपासुन म्हणजेच १७ मे पासून ते १९ मे पर्यंत अशा तीन दिवसां मध्ये बोईसर मधल्या टि.व्ही.एम स्कूल च्या मैदानात घेतल्या जाणार आहेत. यासाठी पोलीस प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस मित्र संघटना आदी मोलाचं सहकार्य करत आहेत.