विरार : एकल वापर प्लास्टिक (Single Use Plastic) बंदीच्या अनुषंगानं पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात घनकचरा विभागाकडून विविध ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त चारुशीला पंडित यांच्या निर्देशानुसार वरिष्ठ आरोग्य निरीक्षक अविनाश गुंजाळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग समिती ‘सी’ चंदनसार कार्यक्षेत्रातल्या गावड वाडी तसचं वॉर्ड क्र १९, विरार इस्ट सबवे जवळ दोन गेले दिवस एकल वापर प्लास्टिक बंदीच्या अनुषंगानं वसई विरार शहर महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईत महानगरपालिकेनं १२० किलो प्लास्टिक जप्त केलं असून ३० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.