पालघर : पालघर जिल्ह्यातल्या जव्हार आणि मोखड्या सारख्या अतिदुर्गम भागातल्या लोकांपर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना पोहचिण्यासाठी पालघर जिल्हा प्रशासना अंतर्गत शासन आपल्या दारी या अभियानाचं आयोजन आज पहिल्यांदा पालघर जिल्ह्यातल्या जव्हार शहरातल्या राजीव गांधी मैदानावर करण्यात आलं होतं. या अभियानाचं उद्घाटन आज सार्वजनिक बांधकाम मंत्री, अन्न, नागरी पुरवठा मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी काही योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते साहित्याचं आणि योजनांच्या प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं.
यावेळी मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, सरकारी काम म्हंटलं तर सरकारी काम अन थोड थांब या गोष्टीला कुठे तरी थांबिण्यासाठी या अभियानाच्या माध्यमातून या सरकारच्या कार्यकाळात सुरुवात करण्यात आली आहे. सणाच्या वेळेला सरकारकडून दिला जाणारा आनंदाचा शिधा देण्याचं काम नव्यानं या सरकार केलं आहे असं ते यावेळी म्हणाले. जिल्हा नियोजनाचा निधी या अभियासाठी वापरला जाणार असल्याचं ही मंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. यावेळी त्यांनी उपस्थित लाभार्थ्यांना शुभेच्छा ही दिल्या.
मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नदीत कोसळला टेम्पो ……
शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी लोकांना अनेक कष्ट घ्यावे लागतात, वारंवार त्या कार्यालयाच्या ठिकाणी फेऱ्या माराव्या लागतात, वेळेचा व्यव यासारख्या गोष्टी टाळण्यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान सुरू करण्यात आलं आहे. जेणकरून नागरिक आणि शासन या मधला दुरावा दूर होवू शकेल. शासन थेट लोकांच्या दारी कसं पोहचेल हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून सर्व लाभार्थ्यांना एका छताखाली आणण्याचं काम या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तळागाळातील लोकांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ सहजतेनं देणं हे या अभियांनाचं मुख्य उद्दिष्ट आहे.
शासन आपल्या दरी या अभियानाच्या माध्यमातून जव्हार आणि मोखाडा या दोन तालुक्यातल्या २५ हजार लाभार्थ्यांना शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांचा लाभ देण्यात आला. या कार्यक्रमात वनपट्टे , उत्त्पनाचे दाखले, जातीचे दाखले यासारखे विविध प्रकारचे दाखले, विशेष सहाय्य योजना , पशू संवर्धन, मत्स्य व्यवसाय, वन विभाग, आरोग्य शिबीर, जनजागृतीपर रथ या सारखे विविध योजंनाचे जवळपास ३० स्टॉल्स लावण्यात आले होते. त्यापैकी १५ स्टॉल हे मोखाडा आणि उर्वरित १५ स्टॉल हे जव्हार तालुक्याच्या माध्यमातून लावण्यात आले होते.
ग्रामीण भागातल्या नागरीकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यात पहिल्यांदाचं या अभियांनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार सुनील भुसारा, श्रीनिवास वनगा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, एसडीएम आयुषी सिंह, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या सह हजारोंच्या संख्येनं लाभार्थी आणि नागरिक उपस्थित होते.