पालघर : पालघर जिल्ह्यातल्या मोडगाव इथं रस्ते अपघातात दोन चिमुकल्या भावंडांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भरधाव वेगात असलेल्या पिकअपनं रस्त्यानं चालत असलेल्या या दोन्ही भाऊ–बहिनीला चिरडलं. पालघर जिल्ह्यातल्या उधवा -मोडगाव – धुंदलवाडी या रस्त्यावर हा अपघात झाला. या अपघातात ११ वर्षीय प्रीती मालकरी आणि ८ वर्षीय शाहिद मालकरी या भावंडांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पिकअप चालक मात्र पिकअप घेऊन फरार झाला आहे . दोन्ही मयत चिमुकले पालघरचे आमदार श्रीनिवास वणगा यांच्या जवळचे नातेवाईक असल्याचं सांगण्यात येत आहे.