पालघर : पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्या मधल्या माण इथल्या अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतले शिक्षक चेतन ठाकरे यांना यंदाचा युथ एज्युकेशन आयकॉन अवार्ड पुरस्कार जाहीर झाला आहे. नेहरू युवा केंद्र पणजी, गोवा व किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय युवा सामाजिक कला संमेलनाचं आयोजन गोव्यात करण्यात आलं आहे. रविवारी 9 जुलै ला पणजी-गोवा इथं हे विद्यमानं राष्ट्रीय युवा सामाजिक कला संमेलन संपन्न होणार आहे.
विक्रमगड इथं राहणारे शिक्षक चेतन रमेश ठाकरे हे अतिशय होतकरू, मेहनती, शिस्तप्रिय आणि विद्यार्थीप्रिय असे शिक्षक आहेत. त्यांचं आदर्श असं व्यक्तीमत्व आहे. शैक्षणिक, सामाजिक, कृषी, क्रीडा, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे आहे. त्यांचा या कार्याची दखल घेत यंदाचा युथ एज्युकेशन आयकॉन अवार्ड पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. रविवारी गोव्यात आयोजित राष्ट्रीय युवा सामाजिक कला संमेलनात त्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. यापूर्वी देखील शिक्षक ठाकरे यांना अनेक राज्यस्तरीय तसचं आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. त्यांना हा पुरस्कार जाहिर झाल्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.