पालघर : जुलै महिन्याचा पहिला आठवडा १-७ जुलै हा महाराष्ट्र शासनाने वनमहोत्सव म्हणून घोषीत केला आहे. या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जाते. त्याअनुषंगाने पालघर जिल्ह्यातल्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि वनविभाग पालघर, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पडघे येथे मुलांनी २५० वृक्षांची लागवड करून वनमहोत्सव साजरा केला.
यावेळी वनअधिकारी गणेश परहर यांनी विद्यार्थांना विविध प्रकारच्या वृक्षांची माहिती देऊन त्यांची उपयुक्तता समजावून सांगितली. तसेच विद्यार्थांना निसर्गाचे संवर्धन करण्या संदर्भात मार्गदर्शन केले.
नाबार्डच्या मदतीनं पालघर जिल्ह्यातल्या अनेक आदिवासी कुटुंबांना मिळतोय रोजगार……
या वनमहोत्सवास वन विभागाचे वनपाल जी. एस. पडवळे, अनिल माढे , वन विभागातील कर्मचारी, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. रोहित गायकवाड, डॉ. अरुंधती बर्डे, डॉ. संगीता ठाकूर आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी आदी उपस्थित होते. या वनमहोत्सव उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे, उपप्राचार्य डॉ तानाजी पोळ, उपप्राचार्य प्रा. महेश देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले.