पालघर : पालघर मध्ये पालघर नगरपरिषदेमार्फत नगराध्यक्ष वर्षा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. रविवारी पालघर नगरपरिषदेच्या शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक समितीमार्फत आयोजित करण्यात आलेल्या या मॅरेथॉनमध्ये पालघर शहरातल्या जवळपास तीन हजार स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. भर पावसात लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून या मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात केली.
यावेळी नगराध्यक्ष उज्वला काळे, उपनगराध्यक्ष उत्तम घरत क्रीडा व शिक्षण समितीचे सभापती चंद्रशेखर वडे, गटनेता कैलास म्हात्रे, भावानंद संखे,नगरपरिषदेचे नगरसेवक आणि नगरसेविका, उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हानमाने, जिल्हा वाहतूक शाखेचे नियंत्रक आसिफ बेग, तालुका क्रीडा अधिकारी भक्ती आंबरे, पालघर नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
ही मॅरेथॉन स्पर्धा एक किलोमीटर पासून ते दहा किलोमीटर पर्यंत घेण्यात आली होती. या मॅरेथॉन मध्ये १४ वर्षाखालील, १७ वर्षाखालील, १९ वर्षाखालील, विधीज्ञ, जेष्ठ नागरिक आणि खुला गट अशा विविध गटातल्या स्पर्धकांनी भाग घेतला होता. विशेषतः तरुणींनी या स्पर्धेत मोठ्याप्रमाणात आपला सहभाग नोंदवला. यावेळी प्रथम तीन क्रमांक पटकावणा-या विजेत्यांना पदक, मानचिन्ह आणि रोख रक्कम असं पारितोषिक देण्यात आलं. या मॅरेथॉन मध्ये 14 वर्षाखालील मुलांमध्ये सुशांत सांगळे यांनी प्रथम, अविनाश जाधव यांनी द्वितीय आणि श्रेयस मरले यांनी तिसरा क्रमांक पटकावला. 14 वर्षाखालील मुलांमध्ये सुशांत सांगळे याने प्रथम, अविनाश जाधव याने द्वितीय आणि श्रेयस मरले याने तिसरा क्रमांक पटकावला. तसचं मुलींच्या 14 वर्षाखालील गटामध्ये शार्वी मोरे हिने प्रथम, श्राव्या मोहिते हिने द्वितीय आणि चार्वी राऊत हिने तिसरा क्रमांक मिळवला.
17 वर्षाखालील गटामध्ये प्रतीक धनगरे याने प्रथम, अक्षय तुंबडा याने द्वितीय आणि हूमेल खान याने तिसरा क्रमांक पटकावला. तर मुलींमध्ये वैदेही कडू, ज्योत्सना सुतार आणि दर्शना मस्कर यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक मिळवला. 19 वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये ऋत्विक मस्कर याने प्रथम, राहुल डवला याने द्वितीय, तर संदेश मोर याने तिसरा क्रमांक मिळवला. तसचं मुलीं मध्ये कृपा रसाळकर हिने प्रथम, रुची चव्हाण हिने दुसरा आणि खुशी प्रजापती हिने तीसरा क्रमांक मिळवला.
विधीज्ञ गटामध्ये हर्षदा थोरात यांनी पहिला, प्रियंका इंगळे यांनी दुसरा आणि सारिका खानोलकर यांनी तिसरा क्रमांक मिळवला. तर याच गटामध्ये मोहन मोरे यांनी पहिला, भरत पाटील यांनी दुसरा, अरुण जयकर यांनी तिसरा क्रमांक पटकावला. ज्येष्ठ नागरिकांमध्ये विलास ठाकूर यांनी प्रथम, विठ्ठल संखे यांनी दुसरा , तर शांतीलाल परदेशी यांनी तिसरा क्रमांक पटकावला. पुरुषांच्या खुल्या गटामध्ये शैलेश गांगोडा यांनी पहिला, सचिन गोविंद यांनी दुसरा, तर अभिषेक पागधरे यांनी तिसरा क्रमांक पटकावला. महिलांच्या खुल्या गटामध्ये जयश्री पुंजारा यांनी पहिला, सोमय्या राव यांनी दुसरा, सोनाली गल्लूगडे यांनी तिसरा क्रमांक मिळवला.