पालघर : अदाणी डहाणू थर्मल पॉवर स्टेशन (ADTPS) अग्निशमन दलाला तारापूर MIDC मधून बोईसर मधल्या रासायनिक कारखान्यात आग लागल्या संदर्भात आपत्कालीन कॉल आला होता. ज्याद्वारे असं सांगण्यात आलं की, तारापुर MIDC रिवाइन इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीत एलडीओ टाकीला मोठी आग लागली आहे. त्यानंतर सुरुवातीला एमआयडीसी मधले अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. आणि नंतर अदाणी डहाणू थर्मल पॉवर स्टेशन अग्निशमन दल आणि इतर पाच अग्निशमन दल एमआयडीसी अग्निशमन दलाला मदत करण्यासाठी सामील झाले. अदाणी डहाणू थर्मल पॉवर स्टेशन (ADTPS) अग्निशमन दलाने पोहोचल्यावर परिस्थिती आणि घटनास्थळाची स्थिती जाणून घेतली आणि मग अग्निशमन अधिकारी देशराज परमार यांच्या देखरेखीखाली तसचं इतर अग्निशमन दलांसह अग्निशमन कार्य सुरू केले. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर सर्व अग्निशमन दलांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. आणि लगतच्या इतर कारखान्यांना देखील आगीपासून वाचवले.
आग आटोक्यात आणण्यासाठी ADTPS अग्निशमन दलाच्या टीमने दिलेल्या पाठिंब्यावर बोलताना, अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडचे प्रवक्ते म्हणाले की , “अदाणी डहाणू थर्मल पॉवर स्टेशन (ADTPS) अग्निशमन दलाने दाखवलेली व्यावसायिकता आणि धाडसा बद्दल स्थानिक अधिकाऱ्यांनी प्रशंसा केली. आम्हाला आमच्या अग्निशमन दलाच्या टीमचा अभिमान आहे. ते नेहमी स्थानिक अधिकारी आणि आजूबाजूच्या भागातील लोकांना आपत्कालीन परिस्थितीत मदत पुरवण्यासाठी तयार असतात. टीम स्थानिक समुदाय, शाळा आणि संस्थांसाठी नियमितपणे अग्निसुरक्षा जागरूकता मोहीम/सत्र आयोजित करत असते.