पालघर : पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्या मधल्या खरिवली इथं पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून श्रमदानाच्या माध्यमातून वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. हा बंधारा बांधण्यासाठी वाडा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे तालुका कृषी अधिकारी सुनील पारधी यांनी गावक-यांना चांगलं सहकार्य केलं. हा वनराई बंधारा झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतील रब्बी पिकाचे नियोजन चांगल्या प्रकारे करता येईल.
वनराई बंधा-याच्या माध्यमातून शेतक-यांना आपल्या शेतात भाजीपाला लागवड करता यावी, त्यासाठी लागणारा पाणी पुरवठा त्यांना व्हावा आणि शेतकऱ्यांच्या शेतातील उत्पादन वाढून त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी तालुका कृषी अधिकारी सुनील पारधी यांनी गावक-यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं. आणि श्रमदानातून त्यांच्या कडून या वनराई बंधारा बांधून घेतला. ज्याचा उपयोग आता शेतक-यांना रब्बी हंगामात पिक घेण्यासाठी करता येईल.