पालघर : चिकू प्रोड्क्सना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पालघर जिल्ह्यातल्या बोर्डी समुद्र किनारी रुरल एंटरप्रूनरस वेल्फेअर फाउंडेशन कडून १० आणि ११ फेब्रुवारीला चिकू फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदाचं हे महोत्सवाचं १० वं वर्ष आहे. रंगात भेद नाही तसा माणसांमध्ये देखील नसावा असा समानतेचा संदेश देण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सामाजिक ऐक्य निर्माण करण्याच्या उद्देशानं यंदा महोत्सवाची थीम सप्तरंगी अशी ठेवण्यात आली आहे.
लहान मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी यंदा किलबिल” हि सोलो टॅलेंट स्पर्धा तसचं आंतरशालेय चित्रकला स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार आहे. यात जवळपास १८ शाळांमधले विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकां कडून देण्यात आली आहे. या सोबत सायकल रेस, मंडला आर्ट, फ्लूइड आर्ट, थ्रीडी क्राफ्ट, पॉटरी, वारली पेंटिग अशा विविध वर्कशॉपचा या महोत्सवात सामावेश आहे. यंदाच्या फेस्टिवल मध्ये जवळ्पास २०० स्टॉल्स लावण्यात येणार असून यात खाद्य पदार्थांच्या स्टॉल्समध्ये पारंपरिक खाद्य पदार्थांचा देखील समावेश असणार आहे.