पालघर : येत्या निवडणुकीत अपकी बार ४५ पार ही आपली भूमिका आहे. त्यामुळे लोकसभेच्या अक्षता ह्या महायुतीच्या पदरातचं पडल्या पाहिजेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पालघर जिल्ह्यातल्या मनोर इथं मिशन ४८ शिवसंकल्प या कार्यक्रमाचं आणि कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होत. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, हे शिवसंकल्प अभियान येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच बिगुल आहे. आता ठाणे आणि पालघर जिल्हे जरी वेगळे वेगळे झाले असेल तरी सुद्धा या जिल्ह्याची नाळ जुळलेली आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडुकीत आपल्याला महायुतीकडून निवडणूक लढवायची आहे. आणि येत्या लोकसभा निवडणुकीत ४५ पेक्षा जास्त जागा आपल्याला लढवायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला केंद्राकडून पाठबळ मिळत आहे असं ही ते म्हणाले.
पहा व्हिडिओ ……
बाळासाहेब आणि अनंत दिघे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आम्ही हे सरकार स्थापन केलं आहे. सत्ता येते आणि जाते,आपण मात्र लोकांसाठी काम केलं पाहिजे. बाळासाहेबांना अपेक्षित असलेले काम आपल्याला करायचं आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे आरोप प्रत्यारोप कडे लक्ष न देता कामाला लागा आवाहन ही त्यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना केलं.
यावेळी उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, विजलेल्या मशाली कधी प्रकाश करू शकत नाहीत. गहाण टाकलेला धनुष्य बाण काढून आणण्याचं काम आम्ही केलं. आता शिवसेना आणि धनुष्यबाण दोन्ही आमच्याकडे आहेत. त्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखत आहे. त्यावर ही आम्ही उपाय शोधला आणि आपला दवाखाना काढला. पुढे ते ठाकरे यांना उद्देशून म्हणाले की, कोविड सेंटर, खिचडी यासारख्या अनेक गोष्टींमध्ये त्यांनी भ्रष्टाचार केले आहेत. सत्तेची आणि पैश्याची भूक किती आहे हे मी जवळून पाहिलं आहे.
या मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी सांगितलं की, गेल्या १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एक देखील भ्रष्टाचाराचा डाग लागला नाही. देशाची अर्व्यवस्था ५ व्या क्रमांकावर नेण्याचं काम त्यांनी केलं. आज परदेशी गुंतवणुकीत भारत देश पुढे आहे हे देखील त्यांच्यामुळेच शक्य होवू शकलं. गेल्या ५०/६० वर्षात जे घडलं नाही ते त्यांनी काही वर्षांच्या काळात करून दाखवलं. आणि त्यामुळेत जगातल्या लोकप्रिय व्यक्तीनं मध्ये आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नाव लोकप्रिय आहे असं ही ते म्हणाले. सर्व सामान्य माणसाला परवडेल अशी पॉलिसी आम्ही आणली असल्याचं ही यावेळी ते म्हणाले.
या शिव संकल्प अभियानात मोठ्या संख्येनं अनेक लोकांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थिती शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.