पालघर : पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी आणि पालघर जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्ह्यात पहिल्यांदा 2023-24 च्या वार्षिक क्रीडा स्पर्धा वरती चर्चा करण्यासाठी चर्चासत्राचं आयोजन करण्यात आल होत. हे चर्चासत्र बोईसर मधल्या तारापूर विद्या मंदिर विद्यालयात संपन्न झालं. सन 2023-24 मध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून होणाऱ्या क्रीडा स्पर्धांचा आढावा या चर्चा सत्रात घेण्यात आला. तसचं पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धांसाठीच्या सूचना या बैठकीत उपस्थितांना देण्यात आल्या.
हेही वाचा :युवा तरुणाने सेंद्रिय शेतीतुन फुलवली फळबाग़
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास वनमाने यांनी माहिती देताना सांगितलं कि, २०२२ मध्ये जिल्ह्यातले 21 हजार खेळाडू विविध स्पर्धां मध्ये सहभागी झाले होते. मात्र २०२३ मध्ये जिल्ह्यातला खेळाडूंचा सहभाग 39 हजारांपर्यंत पोहचला आहे. क्रीडा शिक्षकांनी एक जुटिनं काम करत पालघर जिल्ह्यातून श्वास क्रीडा, ध्यास क्रीडा या टॅगगलाईन प्रमाणे 100 ऑलिंपियन घडविण्याच्या माणस उराशी बाळगला पाहिजे असं हि ते म्हणाले.
या चर्चा सत्रात जिल्ह्यातले १०० पेक्षा अधिक क्रीडा शिक्षक उपस्थित होते. यावेळी डॉ. कुलकर्णी यांनी प्रथमोपचार या विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. दरम्यान जास्तीत जास्त शाळांचा सहभाग क्रीडा स्पर्धांमध्ये कसा वाढवता येईल यावर हि चर्चा करण्यात आली. हे चर्चासत्र यशस्वीरित्या पार पडण्यासाठी तारापूर विद्यामंदिरचे क्रीडा शिक्षक प्रकाश पळसुले, किरण थोरात यांचे मोलाचे सहकार्य लाभले.