पालघर : जलशक्ती मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं नागरिकांना स्वच्छ भारत अभियान ग्रामीण, जल जीवन मिशन (Jal Jeevan Mission) आणि गाळयुक्त शिवार या योजनांची माहिती देण्यासाठी तसचं या योजनांबाबत नागरिकां मध्ये जनजागृती करण्यासाठी पालघर जिल्हयातल्या 899 गावांमध्ये 4 जलरथ भेट (Jal Rath) देणार आहे. डहाणू मध्ये आयोजित सरपंच महापरिषद कार्यक्रमात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून हा जलरथ तालुक्यासाठी रवाना करण्यात आला.
हेही वाचा : वसई ते भाईंदर प्रायोगिक तत्त्वावर रो-रो सेवा सुरु
हा जलरथ गावागावात जावून योजनांविषयी जनजागृती करणार आहे. ग्रामीण भागात लोकसहभागातून शाश्वत पाणीपुरवठा, गावातील पाण्याचे स्त्रोत शाश्वत स्वरूपात निर्माण करून बळकट करणे या उद्देशानं जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन टप्पा -2, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार आणि जलयुक्त शिवार या योजनां विषयी ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून जल रथाच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
या तिन्ही योजनांमध्ये ग्रामस्थांचा लोकसहभाग वाढावा यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून राज्यातल्या 34 जिल्ह्यातल्या 351 तालुक्या मधल्या गावांमध्ये जल रथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. त्या अनुषंगानं पालघर जिल्ह्यातल्या 4 तालुक्यां मध्ये जल रथाद्वारे प्रचार प्रसिद्धी करण्यात येईल.
गावात जल रथाच्या माध्यमातून ऑडिओ जिंगल्स, गावात माहितीपर पोस्टर्स लावणे, ग्रामस्थांना माहितीपत्रक देणे, तसचं नियुक्त केलेल्या समन्वयकां कडून योजनेची माहिती ग्रामस्थांना देणे यासारखी कार्य केली जाणार आहेत.