पालघर : 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त पालघर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत जाणता राजा या महानाट्याचं आयोजन करण्यात येणार आहे. 6 ते 8 मार्च या कालावधीत पालघर मधल्या आर्यन हायस्कूलच्या क्रीडांगणावर रात्री 7 ते 10 या वेळेत जाणता राजा या महानाट्याचं आयोजन करण्यात येणार आहे.
पालघर दुहेरी हत्याकांड, पोलिसांनी एका संशयिताला घेतलं ताब्यात
या महानाट्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, नितीची, चरित्राची, विचारांची आणि कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना आणि विशेषत: तरुण पिढीला होवू शकेल. त्यामुळे या महानाट्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केलं आहे. हे महानाट्य बघण्यासाठी लागणारे पास जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येणार आहेत.
महानाट्य सादरीकरण करण्यासाठी शासनानं जिल्हास्तरावर जिल्हा समन्वय व सहनियंत्रण समितीची स्थापना केली असून जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष आहेत.