पालघर : पालघर जिल्ह्यातल्या बोईसर जवळील कुडण गावात गुरुवारी रात्री भिवराव पाटील आणि मुकुंद पाटील या दोन वृद्धांच्या हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. बोईसरचे डीवायएसपी विकास नाईक यांनी याविषयी माहिती देताना सांगितलं की, ही व्यक्ती मानसिकदृष्ट्या कमकुवत असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुहेरी हत्याकांडाचा तपास तारापूर पोलीस करत आहेत.
डहाणू सरकारी रुग्णालयाच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळले
गुरुवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास कुडण गावात एका अज्ञात व्यक्तीने डोक्यात कुऱ्हाडीनं वार करून दोन वृद्धांची हत्या केल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. मारेकऱ्यानं या दोन वृद्धांच्या डोक्यावर अत्यंत क्रुरतेनं वार करून त्यांची हत्या केली होती की, त्यांच्या डोक्याचे भाग अगदी छिन्नविछिन्न झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून रात्री ग्रामस्थांच्या मदतीनं आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान घटनास्थळापासून काही अंतरावर दलदलीत लपून बसलेल्या या संशयित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं.