पालघर : पालघर जिल्ह्यातल्या डहाणू उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवारी प्रसूती वॉर्डातील बेड वर स्लॅबच्या प्लास्टरचा मोठा भाग तुटल्यानं महिला रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. सांगण्यात येत आहे की, काही दिवसांपूर्वीच त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे स्लॅबच्या प्लास्टरचा काही भाग अचानक तुटून बेडवर पडला. सुदैवानं एका ही महिला किंवा तिच्या बाळाला इजा झाली नाही.
पालघर दुहेरी हत्याकांड, एक संशयित ताब्यात
या घटनेबाबत माहिती देताना डहाणू पीडब्ल्यूडीचे अधिकारी म्हणाले की, या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनानं पीडब्ल्यूडीला पत्र दिले आहे. हे प्लास्टर का पडले याचा तपास आमचे अधिकारी करत आहेत. रूग्णालयात NHRM चे काम देखील चालू आहे, त्यामुळे सुद्धा हे प्लास्टर पडले असावे असा आमचा प्राथमिक अंदाज आहे.