पालघर : महाराष्ट्र शासन कृषि विभागातला मानाचा मानला जाणारा असा डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न हा पुरस्कार पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यां मधल्या सांगे या गावात राहणारे शेतकरी अनिल नारायण पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे. शेतकरी अनिल यांनी कृषि क्षेत्रामध्ये दिलेल्या आपल्या योगदानाची आणि मेहनतीची ही एक प्रकारे पोहच पावतीच म्हणावी लागेल.
हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर शेतकरी अनिल पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं कि, आपल्या या कृषि क्षेत्रातल्या प्रवासात कुटुंबाची आणि कृषि विभागाची साथ सतत मिळत राहिल्यानं आज हे शक्य होवू शकलं आहे. त्यामुळे हा पुरस्कार केवळ माझ्या एकट्याचा नसून आपल्या सर्वांचा आहे.
हेही वाचा : वसई ते भाईंदर प्रायोगिक तत्त्वावर रो-रो सेवा सुरु
शेतकरी अनिल नारायण पाटील यांना डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तालुका कृषि अधिकारी सुनील पारधी यांनी आपल्या संपूर्ण कृषी विभागाच्या टीम सह शेतकरी अनिल यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कृषि विभागाकडून शुभेच्छा दिल्या. आणि त्याचं अभिनंदन केलं.