पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघात नवीन मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या लोकसभा निवडणुकीत पालघर लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांची संख्या 1 लाख 38 हजारांहून अधिक झाली आहे. आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत हे नवीन मतदार निर्णायक भूमिका बजावू शकतील. ही नव मतदारांची आकडेवारी 1 मार्च 2024 पर्यंतची आहे. त्यामुळे येत्या काळात मतदारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत नवीन मतदारांना आपल्याकडे ओढ़ण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे.
दुहेरी हत्याकांड, न्यायालयाने सुनावली ७ दिवसांची पोलीस कोठडी
2019 च्या लोकसभा निवडणुकीतल्या मतदार संख्येबद्दल बोलायचं झाल्यास, मतदारांची संख्या 19 लाख 51 हजार 668 इतकी होती. तर आता मार्च 2024 मध्ये मतदारांची संख्या 20 लाख 89 हजार 710 इतकी झाली आहे. यामध्ये महिला मतदारांची संख्या ही 9 लाख 95 हजार 528 आहे. तर पुरुष मतदारांची संख्या 10 लाख 93 हजार 967 इतकी आहे. त्याचबरोबर पालघर लोकसभा मतदारसंघात 215 तृतीयपंथी मतदार आहेत. सद्यस्थितीत पालघर जिल्ह्यातल्या नालासोपारा विधानसभा मतदारसंघात इतर विधानसभांच्या तुलनेत सर्वाधिक मतदार आहेत.
विधानसभा निहाय विचार केल्यास(128) डहाणू विधानसभेत 2 लाख 80 हजार 596 मतदार आहेत. ज्यात १ लाख ४० हजार ८०१ पुरुष मतदार आणि १ लाख ३९ हजार ७६४ इतक्या महिला मतदार आहेत. (१२९)विक्रमगड विधानसभेत ३ लाख १ हजार ६३५ मतदार असून त्यात १ लाख ५१ हजार ६२१ पुरुष मतदारांचा आणि १ लाख ५० हजार १३ महिला मतदारांचा समावेश आहे.(130) पालघर विधानसभा मतदारसंघात 2 लाख 75 हजार 405 मतदार असून त्यात पुरुष मतदार हे 1 लाख 39 हजार 151 इतके आहेत तर महिला मतदार या 1 लाख 36 हजार 233 इतक्या आहेत.(१३१) बोईसर विधानसभा मतदारसंघात ३ लाख ६९ हजार ४४८ इतके मतदार मतदार असून त्यात २ लाख १ हजार २१६ पुरुष मतदार तसचं १ लाख ६८ हजार १९४ इतक्या महिला मतदार आहेत.(132) नालासोपारा विधानसभा मतदारसंघात 5 लाख 35 हजार 083 मतदार असून त्यात 2 लाख 91 हजार 943 पुरुष मतदारांचा आणि 2 लाख 43 हजार 024 इतक्या महिला मतदारांचा समावेश आहेत.(133) वसई विधानसभा मतदारसंघात 3 लाख 27 हजार 543 इतके मतदार असून त्यात पुरुष मतदार हे 1 लाख 69 हजार 235 इतके आहेत तर 1 लाख 58 हजार 300 इतक्या महिला मतदार आहेत.