पालघर : पालघर जिल्ह्यातल्या वसई तालुक्यात अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्या बोटींवर कारवाई करण्यात आली असून या बोटी नष्ट करण्यात आल्या आहेत. वसई तालुक्या मधल्या काशिदकोपर या ठिकाणी अनधिकृतपणे रेती उत्खनन करणाऱ्या 4 बोटींवर कारवाई करण्यात आली असून यावेळी 1 सक्शन पंप आणि 4 बोटी जिलेटीनच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या. पालघरचे अपर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा खनिकर्म अधिकारी व मंडळ अधिकारी काशिदकोपर, तलाठी, भरारी पथकातील कर्मचारी यां टीम ही कारवाई केली आहे.