पालघर : पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यात दोन ठिकाणी रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. डहाणू तालुक्यातल्या नरपड इथं रेतीने भरलेल्या पिक अप वर कारवाई करत 3 ते 4 ब्रास रेतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसचं चिखले इथं रेती गोण्यामधे भरून अवैध मार्गानं घेऊन जाण्याच्या उद्देशानं ठेवलेल्या साठ्यावर हि कारवाई करत तो साठा निष्काकित करण्यात आला आहे. या कारवाई मध्ये रेती गाडी मालकांकडून 1,25,000 रुपये इतका दंड वसूल करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनकडून देण्यात आली आहे. या जप्त करण्यात आलेल्या रेतीचा 2,00,000 रुपये इतका महसूल शासन जमा होणार होईल. हि कारवाई डहाणूचे सहाय्यक जिल्हाधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाकडून करण्यात आली आहे.