पालघर : महावीर जयंती हा जैन धर्माचा सर्वात खास दिवस आहे. जैन धर्माचे 24 वे आणि शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंती स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्याची परंपरा आहे. दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तेराव्या तिथीला हा उत्सव साजरा केला जातो. याच महावीर जयंतीनिमित्त पालघर जिल्ह्यातल्या बोईसर, पालघर शहरात भगवान महावीर यांची मूर्ती रथामध्ये ठेवून भव्य शोभा यात्रा काढण्यात आल्या. पालघर शहरात पालघर मधल्या जैन मंदिरापासून ते जैन स्थानकापर्यंत वाजतगाजत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. तर बोईसर मध्ये ओस्तवाल मधल्या समताभवन पासून ते जैन स्थानकापर्यंत वाजतगाजत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. पालघर, बोईसर शहरात काढण्यात आलेल्या शोभा यात्रेत लहानमुलं, आणि महिला वर्ग हि मोठ्या संख्येनं सहभागी झाला होता. जिल्ह्यातल्या विविध भागांत देखील महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा काढून महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
पहा व्हिडीओ : https://youtu.be/aE-mi7k0UFk?si=S7MccrpIwDcPbjIz
भगवान महावीर यांच्या विषयी :
भगवान महावीर यांच्या विषयी सांगायचं झाल्यास यांचा महावीर जन्म इ.स.पूर्व 599 मध्ये वैशाली म्हणजेच (आजच्या बिहारमध्ये) क्षत्रिय राजघराण्यात झाला होता. त्यांना लहानपणापासूनच अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाची आवड होती. वयाच्या 30 व्या वर्षी त्यांनी घर सोडल. आणि तपश्चर्या आणि आत्मज्ञानाचा शोध सुरू केला. अनेक वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर, 527 BC मध्ये त्यांना ज्ञान प्राप्त झाल. आणि ते महावीर म्हणून ओळखले जाऊ लागले. भगवान महावीरांनी जगाला अहिंसा, सत्य, अस्तेय आणि ब्रह्मचर्य या पंचशील तत्त्वांचा उपदेश दिला. भगवान महावीरांनी अहिंसेला जीवनाचे सर्वोच्च तत्व मानले. त्यांनी सर्व प्राणिमात्रांप्रती करुणा आणि प्रेमाचा संदेश दिला. महावीर जयंती अहिंसेच्या या महान संदेशाची आठवण करून देते आणि लोकांना सर्व प्राणीमात्रांप्रती दयाळूपणे वागण्याची प्रेरणा देते.
महाराष्ट्रात 440 मतदान केंद्रांचे नियंत्रण नारीशक्तीच्या हातात
महावीरांनी आत्मसाक्षात्कार हे जीवनाचे अंतिम ध्येय मानले आहे. त्यांनी समाजसुधारक म्हणून विशेष भूमिका बजावली. त्यांनी जातिवाद, लिंगभेद आणि अनेक सामाजिक वाईट गोष्टींविरुद्ध आवाज उठवला आणि सर्व मानवांना समान वागणूक देण्याचे आणि त्यांना समान हक्क आणि संधी देण्याचे समर्थन केले. महावीर जयंती सामाजिक न्याय आणि समतेची प्रेरणा देते. धर्माव्यतिरिक्त अनेक लोक शांतता आणि अहिंसेचा संदेश देण्यासाठी हा दिवस साजरा करतात.