पालघर : पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आचोळे इथल्या मुख्य अग्निशमन केंद्रात आचोळे आज अग्निशमन सेवा दिनानिमित्त आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार यांच्या हस्ते अग्निशमन ध्वजास मानवंदना देऊन सलामी देण्यात आली. यावेळी शूरवीर हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. तसचं भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. आजपासून वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात अग्निशमन सेवा सप्ताहाला सुरुवात करण्यात आली आहे.
अग्निशमन दलाच्या ६६ शहीद जवानांच्या स्मृती प्रित्यर्थ अग्निशमन सेवा सप्ताह
यावेळी अग्निशमन सेवा सप्ताहाविषयी आणि अग्निशमन विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवांविषयी उपस्थितांना माहिती दिली. तसचं याठिकाणी अग्निशमन साहित्य प्रदर्शनी देखील ठेवण्यात आली होती. या अग्निशमन साहित्यांबद्दल हि उपस्थितांना माहिती देण्यात आली. त्यांनतर अग्निशमन विभागाकडून जनजागृतीपर रॅली देखील काढण्यात आली. १४ पासून ते २० एप्रिल पर्यंत वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात ‘अग्निशमन सेवा सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे.