पालघर : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी ही ४ जून ला सकाळी आठ वाजता पासून होणार असून या मतमोजणीसाठीची जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पालघर लोकसभा मतदार संघातली मतमोजणी ही पालघरच्या सूर्या कॉलनी इथल्या गोदाम क्र.२ या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी एकूण ७ हॉल मध्ये EVM ची मतमोजणी होणार आहे. प्रत्येक हॉल मध्ये १४ टेबल लावण्यात आले आहेत.
यावेळी ९८ टेबल वर मतमोजणी होणार आहे. यात १२८-डहाणू, १२९-विक्रमगड, १३०-पालघर, १३१-बोईसर, १३३-वसई या पाच ठिकाणची मतमोजणी ही प्रत्येकी एका हॉल मध्ये १४ टेबल वर होणार आहे. तसचं १३२- नालासोपारा विभागातली मतमोजणी २ हॉल मध्ये होणार आहे. दरम्यान प्रत्येक टेबलसाठी १ मतमोजणी पर्यवेक्षक(Counting Supervisor), १ मतमोजणी सहाय्यक(Counting Assistant), आणि १ सूक्ष्म निरिक्षक (Micro Observer) यांची नेमणूक करण्यात आली आहे.
स्ट्रॉगरुम मधून मतमोजणी केंद्रा ( Counting Hall ) पर्यंत मशीन्सची ने-आण करण्यासाठी प्रत्येक टेबलनिहाय एका शिपाईची नेमणूक करण्यात आली आहे. पोस्टल बॅलेट (Postal Ballot) मोजण्यासाठी ६ टेबल लावण्यात आले असून सर्विस वोटर्स (Service voters) (ETPBMS) ची मोजणी ही २ टेबल वर होणार आहे.
४ जून ला सकाळी ५ वाजता पोस्टल बॅलेटचे सुरक्षा कक्ष उघण्यात येईल, त्यानंतर सकाळी ६.३० वाजता सुर्या कॉलनी इथले सुरक्षा कक्ष उघण्यात येतील. त्यानंतर सकाळी ८ वाजता गोपनियतेची शपथ घेऊन मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होईल. दरम्यान पहिल्यांदा Postal Ballot आणि ETPBMS ची मतमोजणी होईल. या ठिकाणी सर्वात जास्त २९ फेऱ्यांमध्ये बोईसर मध्ये तर सर्वात कमी १९ फेऱ्यांमध्ये नालासोपा-यात मतमोजणी होणार आहे. एकूण ९८ टेबल वर ही मतमोजणी होणार आहे.
विधानसभेच्या मतदान केंद्राची फेरीनिहाय मतगणना :
1) विधानसभा मतदार संघ – १२८-डहाणू, मतदान केंद्र संख्या – ३३०, टेबलची संख्या – १४, फेऱ्या –२४
2) विधानसभा मतदार संघ – १२९-विक्रमगड, मतदान केंद्र संख्या – ३५३, टेबलची संख्या – १४, फेऱ्या – २६
3) विधानसभा मतदार संघ – १३०-पालघर, मतदान केंद्र संख्या – ३२२, टेबलची संख्या – १४, फेऱ्या – २३
4) विधानसभा मतदार संघ – १३१-बोईसर, मतदान केंद्र संख्या – ४०६, टेबलची संख्या – १४, फेऱ्या –२९
5) विधानसभा मतदार संघ – १३२–नालासोपारा, मतदान केंद्र संख्या – ५११, टेबलची संख्या – २८, फेऱ्या – १९
6) विधानसभा मतदार संघ – १३३-वसई, मतदान केंद्र संख्या – ३४८, टेबलची संख्या – १४, फेऱ्या – २५