पालघर : पालघर जिल्ह्यातल्या आदीवासी महिलांनी गगनभरारी घेत दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. शिक्षणापासून दुरावलेल्या पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्या मधल्या टेटवाली गावात राहणाऱ्या ६ गृहिणी महिलांनी दहावीची परीक्षा उतीर्ण करत शिक्षणाच्या प्रवाहात पदार्पण केलं आहे.नुकताच दहावीची निकाल जाहीर झाला. त्यात नमिता भुरकुड यांनी 58.80 टक्के, गीतांजली भुरकुड यांनी 57.20 टक्के, अंजली फडवळे यांनी 62.20, निकिता भुरकुड यांनी 53.80, अलका मेढा 46.60 आणि जागृती फडवळे यांनी 48.40 टक्के मिळवत दहावीच्या परीक्षेत यश मिळवलं आहे.
धरण उशाला आणि कोरड घशाला, रात्रभर विहिरी भोवती पहारा
या महिला पूर्वी चूल आणि मुल या म्हणी प्रमाणे केवळ आपल्या घरची काम आणि शेतीची काम करून इतरत्र मजुरीच्या कामासाठी जायच्या. मात्र त्यांनतर केशव सुष्टी या संस्थेने या गावतल्या महिलांना सक्षम करण्याचा विढा उचलला. या संस्थेने या महिलांना बांबूपासून अनेको कलाकृती तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं. आणि त्या प्रशिक्षणामुळे या महिला बांबूपासून विविध कलाकृती तयार करण्याच्या कामात अत्यंत तरबेज झाल्या. तयार केलेल्या वस्तू विविध ठिकाणी लोकांमध्ये जावून विकण्यासाठी काही कला कौशल्य हि तितकीच आवश्यक असतात हे जाणून केशव सुष्टी संस्थेने या आदिवासी महिलांना शिक्षित करण्याचं ठरवलं. यासाठी ६ ते ७ महिला पुढे आल्या आणि त्यांनी शिकण्याचा निर्धार केला. आणि या आदिवासी महिलांनी घरची काम करून, बांबू हस्तकलेच्या वस्तू तयार करून मिळालेल्या थोड्याफार वेळेत दहावीचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि आज दहावीची परीक्षा पास केल्याने या ६ महिलांना त्यांच्या अथक परिश्रमाचं फळ मिळालं आहे.
नमिता यांनी 2009 मध्ये आपलं शिक्षण सोडलं होत. आणि आता 15 वर्षांनी पुन्हा त्या शिक्षणाच्या प्रवाहात आल्या. गीतांजली यांनी 1997 मध्ये आपलं शिक्षण सोडलं होत. 27 वर्षांनी पुन्हा त्या शिक्षणाच्या प्रवाहात आल्या. अलका यांनी 2005 मध्ये आपलं शिक्षण सोडलं होत. 19 वर्षांनी त्या पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आल्या. निकिता भुरकुड यांनी 2018 मध्ये आपलं शिक्षण सोडलं होत. त्या 6 वर्षांनी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आल्या. अंजली फडवळे यांनी 2000 शिक्षण सोडलं होत. 23 वर्षांनी पुन्हा त्या शिक्षणाच्या प्रवाहात आल्या. जागृती फडवळे यांनी आठवी नंतर आपलं शिक्षण सोडलं होत.
शिक्षणात बऱ्याच वर्षांचा खंड पडून ही पुन्हा शिकण्यासाठी मिळालेला आधार घेवून या महिलांनी आपल्या जिद्दीच्या बळावर दहावीची परीक्षा पास करून यश मिळवलं आहे. आणि हे करून त्यांनी आपल्या मुलांसाठी त्याचबरोबर इतर आदिवासी महिलांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.